मुंबई महानगर क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी अकरावी ऑनलाइन प्रवेशाबाबतच्या सर्व समावेशक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यात अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापक कोटय़ात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्या कनिष्ठ महाविद्यालयात सदर कोटय़ात प्रवेश घ्यावयाचा असल्यास तेथे प्रत्यक्ष जावून त्या कोटय़ातील प्रवेश अर्ज भरून त्याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश अर्ज सादर करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक बी.बी चव्हाण यांनी केले आहे.
तसेच कनिष्ठ महाविद्यालयात ५० रुपये शुल्क भरून संगणकीकृत प्रवेश पावती घेणे घेणे आवश्यक आहे. ज्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार क्रमांक लागेल त्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालायत रुपये ५० शुल्क भरून ऑनलाईन प्रवेश घेणे अनिवार्य राहिल. प्रवेश न घेतल्यास तो विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियच्या बाहेर जाईल. प्रवेश घेतल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रवेश निश्चित झाल्याची संगणकीकृत पावती घेणे आवश्यक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांला दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळाला असेल,त्यांना पूर्वीच्या कनिष्ठ महाविद्यालयात घेतलेला प्रवेश ऑनलाईन रद्द करून प्रवेश रद्द झाल्याची संगणीकृत पावती घेवून दिलेल्या मुदतीत नवीन कनिष्ठ महाविद्यालायात प्रवेश घ्यावा लागेल.