News Flash

‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग

कथेच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे गेले सध्या महाराष्ट्रभर करीत आहेत.

कथेच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे गेले सध्या महाराष्ट्रभर करीत आहेत.

नाटककार आणि साहित्य अकादमी पुरस्कारविजेते कथाकार जयंत पवार यांची ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ ही वेगळ्या रूपबंधाची आणि आशयाची दीर्घकथा साहित्यवर्तुळात बरीच चर्चिली गेली. या कथेच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे गेले सध्या महाराष्ट्रभर करीत आहेत. पेठे यांच्या या वैशिष्टय़पूर्ण प्रयोगाला जाणकारांकडून उत्तम दाद मिळत आहे. या आगळ्या प्रयोगाची प्रकाशयोजना प्रदीप वैद्य यांनी केली आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, गडहिंग्लज, रत्नागिरी, बेळगाव येथे ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’चे प्रयोग सादर झाले आहेत. या अभिवाचनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग मुंबईत शुक्रवार, १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता यशवंत नाटय़मंदिर (माटुंगा) येथे होणार आहे. ‘नाटकघर’ संस्थेतर्फे होणाऱ्या या प्रयोगाला मुंबईच्या ‘अस्तित्व’ संस्थेचे साहाय्य लाभले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2016 12:52 am

Web Title: innovative reading performance by veteran theater personality atul pethe
टॅग : Atul Pethe
Next Stories
1 ‘देवनारप्रकरणी त्वरित श्वेतपत्रिका काढावी’
2 बच्चू कडू यांना जामीन
3 पैशांचा हव्यासाने तुरुंगाचा मार्ग दाखवला
Just Now!
X