News Flash

विद्यार्थ्यांसाठी ‘इस्रो सायबरस्पेस’ स्पर्धा

विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी ऑफलाइन तयार केलेली गोष्ट पालकांनी ऑनलाइन सबमिट करायची आहे.

विद्यार्थ्यांसाठी ‘इस्रो सायबरस्पेस’ स्पर्धा
संग्रहित छायाचित्र

सध्या शाळा बंद असल्याने घरीच असलेल्या लहान मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) शालेय विद्यार्थ्यांसाठी काही ऑनलाइन ‘इस्रो सायबरस्पेस कॉम्पिटीशन’चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना तासन्तास स्क्रीनसमोर बसण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी ऑफलाइन तयार केलेली गोष्ट पालकांनी ऑनलाइन सबमिट करायची आहे.

इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. ‘ए थ्री’ आकाराच्या पांढऱ्या कागदावर किंवा चार्ट पेपरवर जलरंग, मेणाच्या किं वा पेन्सिलच्या रंगांने चित्र काढावे. पालकांनी चित्राचे छायाचित्र काढून अथवा ते स्कॅन करून पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात पाठवावे.

इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर प्रतिकृती तयार करायची आहे. कार्डबोर्ड, कागद, कपडे, चिकटपट्टी (अधेसिव्ह्ज टेप), रंग आणि गोंद यांशिवाय अन्य कोणतेही साहित्य वापरू नये. प्रतिकृतीची विविध बाजूंनी चार छायाचित्रे काढावीत. कमाल दोन ‘ए फोर’ आकाराच्या कागदांवर छायाचित्रे चिकटवून त्याबाबत माहिती लिहून पीडीएफ स्वरूपात पाठवावे. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘ए फोर’ आकाराच्या कागदावर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहावा. टंकलिखित आणि इंटरनेटवरून घेतलेला मजकूर स्वीकारला जाणार नाही. लिहिलेल्या निबंधाचे छायाचित्र पीडीएफ स्वरूपात पाठवावे.

इयत्ता अकरावी, बारावीसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती इस्रोच्या संके तस्थळावर जाहीर के ली जाईल. भारतातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही स्पर्धा असून नि:शुल्क आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांतील इयत्ता गृहीत धरली जाईल. २०१९-२० या शैक्षणिक वर्षांचे शाळेचे ओळखपत्र स्वीकारले जाईल. सहभागी होण्यासाठी २४ जूनपर्यंत www.isro.gov.in/icc-2020 या संकेतस्थळावर नोंदणी करावी. एक विद्यार्थी एकाच स्पर्धेत भाग घेऊ शकतो. सर्वोत्कृष्ट ५०० विद्यार्थ्यांची नावे संकेतस्थळावर जाहीर केली जातील. ईमेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल.

सहभागी होण्यासाठी काय कराल?

* कागदाच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात नोंदणीकृत संपर्क क्रमांक लिहावा. अन्य कोणतीही माहिती लिहिल्यास बाद ठरवले जाईल.

* फाइलचे नाव नोंदणीकृत संपर्क  क्रमांक असावा.

* स्पर्धेसाठीचे विषय स्पर्धेच्या दिवशी ईमेलद्वारे पाठवले जातील व संके तस्थळावरही उपलब्ध असतील.

* अधिक माहिसाठी : संकेतस्थळ https://www.isro.gov.in/icc-2020,  ईमेल आयडी –  icc-2020@isro.gov.in, संपर्क  – ०८० -२३५१५८५० (सकाळी १० ते सायं. ५)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:32 am

Web Title: isro cyberspace competition for students abn 97
Next Stories
1 सौर कृषीपंप योजनेस करोनाचा फटका
2 मुंबईतील करोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील ७७ टक्के रुग्ण
3 बनावट सोयाबीन बियाणांमुळे शेतकरी हवालदील
Just Now!
X