युरोपातल्या शहरांमध्ये एक टाऊन स्क्वेअर असतो. जो मध्यभागी असतो तिथं सगळी लोकं वेगवेगळ्या निमित्तानं जमतात. तसा मुंबईचा टाउन स्क्वेअर, फ्लोरा फाउंटन किंवा आता ज्याचं नाव हुतात्मा चौक आहे तो भाग आहे.

फोर्ट म्हणजे मुंबईच्या किल्ल्याला तीन गेट होती. एक बझार गेट होतं, दुसरं अपोलो गेट आणि तिसरं सेंट थॉमस कथेड्रलच्या बाहेर म्हणजे इथं जे गेट होतं त्याला चर्च गेट म्हणायचे. त्यामुळे इथं स्टेशन जेव्हा बांधण्यात आलं त्याला चर्चगेट नाव मिळालं. नंतर जेव्हा किल्ला तोडण्यात आला तेव्हा गेटही तोडण्यात आलं आणि हा भाग मुंबईचा टाउन स्क्वेअर झाला. या भागामध्ये सुंदर काहीतरी असावं म्हणून फ्लोरा फाउंटन बांधण्यात आलं. या फ्लोरा फाउंटनचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…