23 January 2020

News Flash

कोहिनूर मिल प्रकरण – राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस

कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे कळत आहे.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे कळत आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर त्यांनी निवडणूकीत ईव्हीएम घोटाळा केला आहे, असे आरोप केले होते. तसेच ईव्हीएम ऐवजी पुन्हा एकदा बॅलेटपेपरवरच निवडणूक घ्यावी यासाठी विरोधी पक्षांची एक संयुक्त पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘मला अजूनतरी ईडीकडून हॅलो आलेले नाही’ असे म्हटले होते. राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

First Published on August 19, 2019 12:36 am

Web Title: kohinoor mill case ed notice raj thackeray mpg 94
Next Stories
1 कावळ्यांची चिंता करायची नाही तर, मावळ्यांची चिंता करावी – पवार
2 मुंबई : लोकलच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक
3 पूरग्रस्तांच्या मदतीला धावलेल्या मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना बोनस
Just Now!
X