परिवहन कार्यालयात अपुरे मनुष्यबळ; सर्व कामांत विलंब

मुंबई: मुंबईतील चारही प्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांच्या रिक्त जागांमुळे वाहनांशी संबंधित कामांना विलंब होत आहे. परवाने (लायसन्स) मिळवण्यासाठी चालकांना खूप काळ प्रतीक्षा करावी लागते. एक वर्षांहून अधिक काळ हीच परिस्थिती असूनही या जागा भरण्याबाबत काहीच हालचाल झालेली नाही. परिणामी ‘आरटीओ’त कामासाठी येणाऱ्यांना दिरंगाईला सामोरे जावे लागत आहे.

ताडदेव आरटीओत मोटर वाहन निरीक्षकाच्या १२ पैकी ६ जागा भरल्या आहेत. या आरटीओत सर्वाधिक रिक्त जागा सहाय्यक  मोटर वाहन निरीक्षकांच्या आहेत. सध्या २७ पैकी एकच सहाय्यक कार्यरत आहेत. शिकाऊ लायसन्ससाठी अपॉइंटमेंट ऑनलाइन असल्या तरीही कर्मचारीच नसल्याने ती अपॉइंटमेंटही चालकांना वेळेत उपलब्ध होत नाही. नव्या कायस्वरूपी लायसन्ससाठी प्रयत्न करणाऱ्यांना नजिकच्या कालावधीत वेळ देण्यात येत नाही. वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्यांनाही ताटकळतच राहावे लागते. हीच परिस्थिती उर्वरित तीन आरटीओचीही आहे. बोरीवली आरटीओत मोटर वाहन निरीक्षकांच्या १२ पैकी नऊ जागा भरलेल्या आहेत. या नऊमध्येही चार कर्मचारी मुंबईबाहेरून तात्पुरत्या स्वरुपात बोलावण्यात आले आहेत. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाच्या २२ पैकी ११ जागा भरल्या आहेत. त्यातही तीन नियमितपणे कामावर असून ऊर्वरित प्रशिक्षणासाठी बाहेर आहेत. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होण्यास सात ते आठ महिने लागणार आहेत. अंधेरी आरटीओचीही हद्द मोठी आहे. परंतु तिथेही मोटर वाहन निरीक्षकाची २१ पैकी के वळ सहा पदे भरलेली असून चार कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. या आरटीओतील सहाय्यक निरीक्षकांच्याही ३० पैकी २० पदे भरलेली आहेत. २० पैकी पाच कार्यरत असून १५ कर्मचारी प्रशिक्षणासाठी अन्यत्र गेले आहेत.

कामे होईना

शिकाऊ, कायमस्वरूपी लायसन्स (अनुज्ञप्ती) आणि परवाना (परमिट), त्यांचे नूतनीकरण याशिवाय वाहनांशी संबंधित कामे घेऊन अनेक जण आरटीओत येतात. यासाठी काहींचा अर्धा दिवसही जातो. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात आरटीओतील कामे बंदच होती. टाळेबंदी शिथिल होताच साधारण जून महिन्यापासून कामांना वेग आला. मात्र प्रथम १५ टक्के  असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नंतर वाढ झाल्याने कामे काही प्रमाणात पुढे सरकू  लागली. परंतु या कामाला म्हणावा तसा वेग आला नाही. कारण पर्याप्त मनुष्यबळाचा अभाव आहे.

कामांची रखडपट्टी..

मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओत रिक्त जागांमुळे अनेक कामे रखडत आहेत. विशेषत: मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांच्या जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त आहे. पक्क्य़ा लायसन्ससाठी वाहन चाचणी, शिकाऊ लायसन्सची चाचणी, वाहन नोंदणी, वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिके ट) ही कामे या दोन पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनच के ली जातात. पण त्यांचीही वानवा असल्याचे दिसत आहे.

बढती प्रक्रियेद्वारे मोटर वाहन निरीक्षक पदे भरली जातात. ती प्रक्रि या होत आहे. तर राज्यात ८३२ पदे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भरण्याचा निर्णय झाला आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा असून त्यानंतर ते सेवेत येतील.

– अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त