महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद या सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, त्यावर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांनी सोमवारी निर्गमित केल्याने सरकारने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
महानंदवर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीची हुकूमत होती. त्यामुळे सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी विशषेत: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देण्यासाठी दुग्ध विकास विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर खडसे यांनी महानंदच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच या संस्थेत गेल्या १० वर्षांत झालेल्या विविध घोटाळ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेशही खडसे यांनी दिले. त्यानंतर संचालक मंडळ निलंबित का करू नये, म्हणून मंडळास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यानंतर महासंघाचे एक संचालक रामराव वडकुते यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तो मंजूरही करण्यात आला. सुनावणीच्या दरम्यान अन्य सदस्यांनी राजीनामे दिले, मात्र संचालक मंडळाने ते स्वीकारले नाहीत. परंतु आपले राजीनामे मान्य करून आपल्याविरुद्धची प्रस्तावित कारवाई रद्द करावी, अशी मागणी ११ संचालकांनी सहनिबंधकांकडे केली होती. त्यानुसार सहनिबंधकांनी हे राजीनामे मंजूर केले, मात्र त्यानंतर ११ संचालकांपकी १० संचालकांनी पत्र पाठवून राजीनामे दिले नसल्याचा दावा केला. मात्र त्यांचा दावा फेटाळण्यात आला. आणि बहुतांश संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतात आल्याचे सांगत त्यावर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
Job Opportunity Opportunities in Maharashtra State Police Force
नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील संधी