27 September 2020

News Flash

मुंबई : विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील इमारतीला भीषण आग

रविवारी सायंकाळची घटना

फोटो सौजन्य : एएनआय

मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील आझाद रोडवर असलेल्या एका इमारतीला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी आगीमुळे अनेक लोक इमारतीत अडकले आहेत. सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग पसरली असून, अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरातील आझाद रोडवर लाभ श्री व्हिला नावाची बहुमजली इमारत आहे. रविवारी सायंकाळी या इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर आगीचा भडका उडाला. शार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीत समोर आलं असून, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून अग्निशामकच्या आणखी चार गाड्या बोलवण्यात आल्या आहेत.

या इमारतीत काही कंपन्यांची कार्यालये असून, सुरूच होती. त्यामुळे काही जण अडकून पडले असल्याची माहिती आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 8:03 pm

Web Title: major fire broke out in vile parle bmh 90
Next Stories
1 लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने; पश्चिम रेल्वेवर जम्बो, तर मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
2 गमावण्याची भीती असलेल्यांचेच मौन!
3 गांधी विचारांचे गारूड
Just Now!
X