मालेगाव येथे २००८ साली बॉम्बस्फोट होऊन सात वर्षे उलटल्यावर या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर नेमके काय आरोप निश्चित करायचे याबाबतची सुनावणी अखेर २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे याप्रकरणी मुख्य आरोपी आहेत.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मुस्लिम बहुल परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यात सहाजणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना बॉम्बस्फोटाचा कट रचणे आणि त्याची अंमलबजावणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्यावर काय आरोप निश्चित करण्यात यावे याबाबत २ फेब्रुवारीपासून युक्तिवादाला सुरूवात होणार आहे.