News Flash

आदिवासी मुलांना मल्लखांबाचे धडे

शहरी भागातील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठमोठाले 'क्लब हाऊस' कार्यरत असतात.

झाडाच्या फांदीला बांधलेली एक दोरी, उघडय़ा माळरानात ओबडधोबड जमिनीवर कसाबसा उभा असलेला मल्लखांब आणि सोबत पाडय़ातील ३२ मुलांना घेऊन कसाऱ्यातील पवन अडोळे हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून मल्लखांबाचे मोफत धडे देत आहे.

काही वर्षांपूर्वी पवन एका शाळेत इंग्रजी व गणित विषय शिकवत होता. मात्र पूर्वीपासूनच मल्लखांब शिकवण्याची इच्छा असल्याने त्याने ही नोकरी सोडून मल्लखांब तळागाळात पोहचवण्याकरिता कसारा गाठले. येथील आदिवासी पाडय़ातील मुले मुळातच काटक आणि चपळ. त्यांना या खेळाचे वेळ त्याने लावले. आज दर शनिवारी व रविवारी कसाऱ्यातील आदिवासी पाडय़ातील ३२ मुले पवनकडे मल्लखांब शिकण्यासाठी येत आहेत. शहरी भागातील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठमोठाले ‘क्लब हाऊस’ कार्यरत असतात. त्यातले काही मुले फिरकत नसल्याने ओस पडले आहेत. मात्र मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या कसाऱ्यातील विहीगाव भागात कोणत्याही साधनसामुग्रीविना आदिवासी, ठाकर आणि कातकरी समाजातील १७ मुली व १५ मुले हा खेळ मोठय़ा आनंदाने खेळत आहेत.आदिवासी मुले झाडावर सरसर चढतात. त्याचा मल्लखांब किंवा अन्य अ‍ॅथलिट प्रकारातील खेळासाठी निश्चितपणे फायदा होईल हे हेरून पववने या मुलांना मल्लखांबाचे धडे देण्याचे ठरविले. पुढे जाऊन या मुलांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनावे या हेतूने मी त्यांना शिकवितो आहे, असे पवनने सांगितले. हत्यारी मल्लखांब, दोरीचा मल्लखांब, पणोत्या मल्लखांब, आंधळी मल्लखांब, खांबाचा मल्लखांब अशा वेगवेगळ्या मल्लखांबाच्या प्रकारांसह मुलींना आत्मसंरक्षणासाठी खास प्रकारच्या बॉक्सींग खेळाचेही प्रशिक्षण पवन देत आहे.दर शनिवारी सहा किलोमीटर लांब पायी चालत ही ३२ मुले विहीगावातील एका ठरलेल्या झाडाखाली जमतात व कसरती सुरु करतात. मात्र एकाच खांबावर आणि दोरीवर इतकी वर्षे कसरती सुरु असल्याने दोरी आणि खांब मोडकळीला आला आहे. दोरी २००० हजार रुपयांत बाजारात उपलब्ध असल्याने पैसे जमवून विकत घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:32 am

Web Title: mallakhamb lesson to tribal children
Next Stories
1 स्त्रियांच्या लैंगिक छळाविरोधात पालिका अधिकाऱ्यांमध्ये जागृती
2 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय रोजगार शून्यतेचे ‘राजीव’ दर्शन
3 सेवाभावाला आश्वासक प्रतिसाद
Just Now!
X