महिलेचे अश्लील एमएमएस बनवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. महेश नाडर (३०) असे या आरोपीचे नाव असून तो धारावीत राहणारा आहे.
या प्रकरणातील ३० वर्षीय पीडित महिला विवाहित आहे. धारावीत महेश नाडर याच्याशी तिची ओळख झाली आणि नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या संबंधाबाबत या महिलेच्या पतीला समजल्यानंतर तिने नाडरशी संबंध तोडले आणि ते दुसरीकडे राहायला गेले. यानंतरही नाडरने  पिच्छा सोडला नाही.