News Flash

मंगळ आणि शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार

३० मे रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ म्हणजे ७ कोटी ५२ लाख ८० हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे.

मंगळ आणि शनी हे दोन ग्रह पुढील आठवडय़ात पृथ्वीच्या जवळ येणार असून रात्री पूर्व दिशेला ते वृश्चिक राशीत साध्या डोळ्यांनी पाहायला मिळणार आहेत. ३० मे रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ म्हणजे ७ कोटी ५२ लाख ८० हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. यापूर्वी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ १४ एप्रिल २०१४ मध्ये आला होता. त्या वेळी त्याचे अंतर ९ कोटी २३ लाख ९० हजार किलोमीटर इतके होते, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

शुक्रवार, ३ जून रोजी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ १ अब्ज ३४ कोटी ९० लाख किलोमीटर इतक्या अंतरावर येणार आहे. यापूर्वी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ १ अब्ज ३४ कोटी ११ लाख किलोमीटर इतक्या अंतरावर २३ मे २०१५ मध्ये आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:02 am

Web Title: mars and saturn will be closer to the earth
टॅग : Mars
Next Stories
1 उपनगरातही समूह विकासाचे धोरण
2 आठवीचे वर्ग नसल्याने सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ दाखला देण्याचे आदेश
3 ध्वनिप्रदूषणाची तक्रार करायचीय?
Just Now!
X