मुंबई : चिराबाजारात परिसरातील मिठावाला इमारतीच्या तळमजल्याला गुरुवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. यात इमारतीचा काही भाग जळाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीच्या ज्वालांमुळे बाजूच्या इमारतीतील रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवताना अधिक प्रयत्न करावे लागत असल्याचे समजते. आग कशामुळे लागली हे समजले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.