मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे शब्दांना धार असणारे आणि सभेतून नागरिकांवर छाप पाडणारे नेते. याशिवाय व्यंगचित्रकार, साहित्याची उत्तम जाण असलेला नेता असे त्यांचे अनेक गुण सांगता येतील. पण या सर्व गोष्टींचे बाळकडू जिथून मिळतात त्या शाळेच्या आठवणींना राज ठाकरेंनी आज उजाळा दिला. निमित्त होते मुंबईच्या दादर परिसरातील बालमोहन शाळेच्या १९८३ मध्ये १० वी पास झालेल्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचे. शाळा सोडून ३५ वर्ष झाल्यानंतर शाळेचे हे सगळे विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते. वयाच्या पन्नाशीमध्ये आपले शाळेचे दिवस आठवणे आणि त्यात रमणे यातली मजा काही औरच.

एरवी नेता म्हणून असणारा मान-सन्मान विसरुन राज ठाकरे अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे या सर्व संमेलनात सहभागी झाले होते. नियोजन, व्यासपीठावरील भाषण अशा कोणत्याच गोष्टीत भाग न घेता त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. आपली सामाजिक प्रतिष्ठा काही काळ बाजूला सारुन राज यांनी अतिशय मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मित्रमंडळींसोबत गप्पा-गोष्टी, सोल्फी काढणे, एकमेकांची खिल्ली उडवणे यांमध्ये ते रमलेले दिसले. काहीही झालं एक नेता आपल्यात आल्याने उपस्थित मित्रमैत्रीणींनी मनमोकळेपणाने त्यांच्यावर टिका केली, तर अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले. राज यांनीही या सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने समजून घेतल्या.

Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
mumbai crime news, woman suicide mumbai marathi news
मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार