जेम्स आणि बॉन्ड या दोघांचे पिल्लू असलेल्या रॅम्बोची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी डोंबिवली येथे घेतली. राज ठाकरे आज डोंबिवली दौऱ्यावर आहेत. कार्यक्रमाला जाण्याआधी ते रॅम्बोला भेटले. ऑगस्ट 2015 मध्ये जेम्सने राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना चावा घेतला होता, ज्यामुळे त्यांच्या चेहेऱ्याला खोलवर जखमा झाल्या. यानंतर जेम्स आणि बॉन्ड या दोघांचीही रवानगी कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली. जेम्स आणि बॉन्ड हे दोघेही ग्रेट डेन जातीचे कुत्रे आहेत. या दोघांसोबतचे राज ठाकरेंचे फोटोही अनेकदा व्हायरल झाले आहेत.
पाहा व्हिडिओ
VIDEO | रॅम्बोला भेटून राज ठाकरेंना आली जेम्स आणि बॉन्डची आठवणhttps://t.co/2jrmCKvB4K pic.twitter.com/QjAj7CoapB
— LoksattaLive (@LoksattaLive) December 15, 2018
त्यामुळे मागील तीन वर्षांपासून राज ठाकरे यांची जेम्स आणि बॉन्ड यांच्याशी भेट झालेली नव्हती. मात्र डोंबिवलीत आल्यावर मनसे कार्यकर्ते राजू पाटील यांच्या घरी या दोघांचे पिल्लू असलेल्या रॅम्बोला भेटून राज ठाकरे काहीसे भावुक झालेले पाहायला मिळाले. राज ठाकरेंच्या स्वभावाचा हा वेगळा पैलू कॅमेरातही कैद झाला आहे.
एक कणखर आणि आक्रमक नेते म्हणून राज ठाकरे महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र त्यांचं श्वानप्रेम अद्याप लपून राहिलेलं नाही. त्यांच्या या व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगली आहे. राजू पाटील यांच्या घरी ते रॅम्बोला भेटले. रॅम्बो त्यांच्या जवळ आला, राज यांनी त्याला कुरवाळले, जवळ घेतले. त्यांच्या स्वभावातला हा वेगळा पैलू आज उपस्थितांना बघायला मिळाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 5:06 pm