मुंबईतील कुलाबा परिसरात शनिवारी रात्री एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला तातडीने जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारांसाठी दाखल करून घेण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून काल(दि.9) त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेच्या तपासातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी त्याच्या घरातून एक डायरी हस्तगत केली असून त्यामध्ये ‘दोन व्यक्तींचं बलिदान दिल्यास आपल्या सर्व समस्या सुटतील’ असं लिहिण्यात आल्याचं समोर आलं आहे. हा उपाय मोरक्को(Morocco) येथील एका महिलेने सांगितल्याचंही या आरोपीने आपल्या डायरीत नमूद केलं आहे. कुलाबा पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी याबाबत माहिती दिली. याबाबत पोलिसांकडून आरोपीकडे अजून चौकशी सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी उशीरा आरोपीने शेजाऱ्याच्या मुलांना घरी बोलावले आणि त्यातील एका मुलीला सातव्या मजल्यावरुन फेकून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Senior Police Inspector,Colaba Police Station:The man is a neighbour of girl’s father.We found his diary in which it was written that a woman in Morocco told him,’all your problems will be solved if you sacrifice 2 people.’He invited the kids home&threw 1 of them from 7th floor. https://t.co/KLsVgV9rpE pic.twitter.com/x7A4OaE8Qd
— ANI (@ANI) September 9, 2019
शनिवारी रात्री उशीरा, कुलाबा येथील रेडिओ क्लबजवळच्या अशोका टॉवर इमारतीत अंगावर काटा आणणारी ही घटना घडली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 9:36 am