मनोहरपंतांची खंत
पन्नास वर्षांपूर्वी मुंबईतील रस्ते धुतले जात हे आज कोणाला पटणार नाही. दुर्देवाने आजची मुंबई ही नियोजनशून्य आणि बकाल झाली आहे. आता उद्योग जगतानेच मुंबईच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगत शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शिवसेनेलाच अप्रत्यक्षपणे घरचा अहेर दिला.
मुंबईत परप्रांतीय वाढत आहेत. त्यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या देशात कोणीही कोठेही जाऊ शकत असला तरी कसाही व कोठेही राहू शकत नाही. ‘मुंबई सर्वाची’ म्हणणारे राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी नेते मुंबईच्या विकासासाठी पुरेसा पैसा मात्र देत नाहीत, अशी टीका मनोहर जोशी यांनी ‘इंडियन र्मचट चेंबर’मध्ये ‘मुंबईचा विकास आणि शिवसेनेचे धोरण’या विषयावर बोलताना केले. मुंबई अत्यंत घाणेरडे शहर झाले असून लोक कोठेही घाण करतात. या लोकांना नागरी भान राहिलेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अनधिकृत बांधकामे वाढत असून त्यांना राजकारण्यांचेच संरक्षण आहे. मतांसाठी अनधिकृत झोपडय़ा हटविण्यास कोणी तयार नाही. इच्छाशक्तीअभावी मोनो-मेट्रो रेल्वे प्रकल्प वेळेत सुरू होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले.

Jitendra Awhad
“ठाण्यात ‘वरून’ हा शब्द सुरू झालाय, तो कुठून येतो? हे…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली