केंद्र सरकारच्या सहाय्याने मुंबई ते नागपूर सहापदरी महामार्ग बांधणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या महामार्गासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून महामार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. अर्थातच या महामार्गावर टोल असणार का? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, या सहा पदरी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त दहा तासांत करणे शक्य होणार आहे. राज्यातील महत्त्वाची शहरे एकमेकांजवळ आणण्याच्या उद्देशाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.