News Flash

मुंबईतील घटना : मैत्री तोडली म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; तरुणाने घेतलं विष

हल्ल्यात तरुणीची आईही जखमी

एका तरुणाने प्रेम प्रकरणातून तरुणीसह तिच्या कुटुंबावर हल्ला केल्याची विरारमधील घटना ताजी असतानाच वसईमध्येही अशीच एक घटना घडली आहे. तरुणाने एका तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आली आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई जखमी झाली आहे. तर हल्ल्यानंतर तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई एव्हरशाईन येथे एका तरुणीवर २९ वर्षीय तरुणीवर तिच्याच मित्राने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ही तरुणी घरी असताना तरुणाने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर तरुण हा या तरुणीचा मित्र असून, तिने त्याच्याबरोबर मैत्रीचे संबंध तोडले होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तरुणाने तरुणीने चाकूने हल्ला केला. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्याचबरोबर यावेळी मध्ये आलेल्या तरुणीच्या आईवरही चाकूने वार केले. सध्या तरुणी आणि तिच्या आईवर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. तरुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. पोलीस घटनेचा अधिक तपास करत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 11:05 am

Web Title: mumbai news vasai virar youth knife attack on girl bmh 90
Next Stories
1 अंबानी स्फोटकं प्रकरण : सीसीटीव्ही, डीव्हीआर सचिन वाझेंच्या सहकाऱ्यांनी नेले
2 महाविद्यालयांतील प्रवेशांत घट
3 ५० रुग्णांचे नमुने ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी
Just Now!
X