04 April 2020

News Flash

मुंबई: रविना टंडनने उद्घाटन केलेल्या स्पामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

विलेपार्ले पश्चिममधील उच्चभ्रू वस्तीमध्ये आहे हे स्पा

सेक्स रॅकेट उधवस्त

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी रात्री विलेपार्ले येथील एका स्पामध्ये छापा टाकून तेथे चालणारे सेक्स रॅकेट उधवस्त केले आहे. ‘द थाय विला’ या नावाने सुरु असणाऱ्या स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून तेथून सहा मुलींची सुटका केली असून सर्व मुली थायलंडच्या आहेत. देहव्यापारासाठी त्यांना बळजबरीने भारतात आणले गेल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने २००८ साली या स्पाचे उद्घाटन केले होते.

विलेपार्ले पश्चिममधील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या दिक्षित रोडवरील ऋषी बिल्डींगमध्ये असणाऱ्या या स्पामधील बेकायदेशील धंद्यांबद्दल पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून महिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात स्पाचा मालक शौरा खान आणि सुमित सिंघानिया या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक कोरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, मुख्य हवलदार गावकर शिंदे, पोलीस नाईक पेडणेकर राऊत पाटील, पोलीस हवलदार महानगडे, महिला पोलिस हवलदार लाड आणि पोलिस अधिकारी निकम या नऊ जणांनी शनिवारी रात्री आठ वाजून ३५ मिनिटांनी या स्पावर धाड टाकली. त्यावेळी येथे स्पाचे दोन्ही मालक आणि व्यवस्थापक शरीरविक्रय व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. तसेच येथून १ लाख २३ हजार रोख रक्कम, एक लॅपटॉप, एक कार्ड स्वाइप मशीन, तीन बिल बुक्स आणि ‘द थाय विला’संदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी सुटका केलेल्या सर्व सहा मुली या थायलंडमधील असून त्यांना पर्यटक व्हिजावर भारतात आणले गेले होते. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या सर्व गोष्टी विलेपार्ले पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या असून पुढील तपास विलेपार्ले पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2019 8:29 am

Web Title: mumbai sex racket busted at vile parle spa 6 thai women rescued scsg 91
Next Stories
1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
2 ‘सर्वासाठी घरे’ योजनेसाठी सरसकट पाच पट चटईक्षेत्रफळ!
3 ‘ए मेरे वतन के लोगों’ची राष्ट्रपतींनाही भुरळ 
Just Now!
X