गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सुरू झाला असून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.गेल्या काही दिवसांत मुंबईत तापाचे २२८४ रुग्ण आढळले असून ६०९ जणांना मलेरिया झाल्याचे उघडकीस आले आहे. काही भागांमध्ये हळूहळू ताप आणि मलेरियाची साथ पसरू लागल्याचे निदर्शनास आले आहे.दूषित पाणीपुरवठय़ामुळे ७२० जणांना गॅस्ट्रोची बाधा झाली आहे. त्याचबरोबर ९४ जण लेप्टो स्पायरोसिसने, सहा जण चिकनगुनियाने, तर दोघे स्वाईन फ्लूने त्रस्त असल्याचे समजते.