News Flash

वादविवादामुळे मुंबईत तरुणीची प्रियकरासमोर ‘लाईव्ह’ आत्महत्या

प्रियकराशी वेबकॅमच्या साह्याने बोलताना वादविवाद झाल्याने मुंबईतील विलेपार्ले भागातील एका तरुणीने वेबकॅमेरा सुरू असतानाच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

| May 23, 2013 11:26 am

वादविवादामुळे मुंबईत तरुणीची प्रियकरासमोर ‘लाईव्ह’ आत्महत्या

 प्रियकराशी वेबकॅमच्या साह्याने बोलताना वादविवाद झाल्याने मुंबईतील विलेपार्ले भागातील एका तरुणीने वेबकॅमेरा सुरू असतानाच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 
संबंधित तरुणी आपल्या लॅपटॉपवरील वेबकॅमेऱयाच्या साह्याने प्रियकरासोबत बोलत होती. त्यावेळी दोघांमध्ये वादविवाद झाला. चिडलेल्या तरुणीने लगोलग घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे सगळ आपल्या लॅपटॉपवर बघत असलेल्या तरूणाने संबंधित तरुणीच्या बहिणीला फोनवरून याबद्दल माहिती दिली. मात्र, ती घरी पोहोचेपर्यंत तरुणीने आत्महत्या केली होती. तरुणीचे आई-वडील कामानिमित्त सुरतला गेले आहेत, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तरुणीचा लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. तरुणीच्या आई-वडिलांना बोलावून घेण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 11:26 am

Web Title: mumbai suicide of girl in front of web camera
Next Stories
1 २००६ च्या स्फोटांतील चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र
2 शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्कारप्रसंगीचा खर्च केवळ कार्योत्तर मंजुरीसाठी – महापौर
3 दोन वर्षांनंतरच मानखुर्दला पुरेसे पाणी
Just Now!
X