News Flash

‘आयटम’ बोलून पळणाऱ्याला महिलेनं पाठलाग करुन पकडलं, विलेपार्ल्यातील घटना

महिला विमानतळावर नोकरीला असून ती बस स्टॉपच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला.

महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाला एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश यादव असे आरोपीचे नाव आहे. विलेपार्ले पूर्वेला डॉ. राजेंद्र प्रसाद नगर भागात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. महिला विमानतळावर नोकरीला असून ती बस स्टॉपच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

महिलेने नवरा, भाऊ आणि कुटुंबियांच्या मदतीने पाठलाग करुन आरोपी दिनेश यादवला पकडले. आरोपीने नशेमध्ये असताना हा गुन्हा केला. दिनेश यादव महिलेला आयटम बोलला व तिथून पळ काढला. महिलेने पाठलाग करुन त्याला पकडले. पीडित महिलेच्या ऑफिसमधील सहकार्याने तिला डॉ. राजेंद्र प्रसाद नगरमधील बस स्टॉपजवळ सोडले. मी रस्त्यावरुन चालत असताना आरोपीने माझी छेड काढली.

मला पाहून अश्लील कमेंटस केल्या. मी त्याचा पाठलाग केला व तो कुठे राहतो ते शोधून काढले. त्यानंतर मी माझ्या कुटुंबियांना बोलावून घेतले व त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दिनेश यादवविरोधात कलम ३५४ (अ) आणि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 4:45 pm

Web Title: mumbai women chases nabs accused who callled her item dmp 82
Next Stories
1 माहूलमध्ये नवीन स्थलांतर नाही, आहेत त्यांनाच पर्याय द्या : हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश
2 ३७० आणि राष्ट्रवाद आमच्या अजेंडाचा भाग असल्याचा अभिमान – देवेंद्र फडणवीस
3 “एखादं गुपित उघड करतील या भीतीने सोनिया गांधी, मनमोहन सिंग चिदंबरम यांच्या भेटीला”
Just Now!
X