फोर्ट भागात भारतीय नौदलाचं मुंबईतील सर्वात मोठं डॉकयार्ड आहे. हे सर्वात जुनं डॉकयार्ड असून मुंबईचं मूळ बंदर आहे. इंग्रज आले तेव्हा जहाजांची किरकोळ बांधणी डागडुजी येथे होत होती. पण खऱ्या अर्थाने १७३५ मध्ये हे डॉकयार्ड झाले. याशिवाय आशिया खंडातील सर्वात जुने ड्राय डॉक येथे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डांबरट आणि डॅम्बिस शब्दांचा जन्म मुंबईतल्या या डॉकयार्डमध्ये झाला. इतकंच नाही तर अमेरिकेच्या राष्ट्रगीताचाही मुंबईतील या डॉकयार्डशी महत्वाचा संबंध आहे. या रंजक इतिहासाबद्दल सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.