28 November 2020

News Flash

नामकरणासाठी पालिकेकडून लवकरच धोरण निश्चिती

मुंबईतील रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी धोरण निश्चित करण्याचा विचार पालिकेत सध्या सुरू आहे. रस्ते, पदपथ, गल्ल्या, चौक, मैदाने, उद्याने यांच्या नामकरणासाठी पालिकेचे धोरण असून त्याआधारेच नामकरण

| February 10, 2013 02:37 am

मुंबईतील रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी धोरण निश्चित करण्याचा विचार पालिकेत सध्या सुरू आहे.
रस्ते, पदपथ, गल्ल्या, चौक, मैदाने, उद्याने यांच्या नामकरणासाठी पालिकेचे धोरण असून त्याआधारेच नामकरण केले जाते. मात्र रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यांना नावे देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या संदर्भात सर्वसमावेशक असे एक धोरण निश्चित करावे. त्यामुळे रुग्णालये आणि मंडयांना भारतीय व्यक्तींची नावे देणे शक्य होईल, अशा ठरावाची सूचना राजू पेडणेकर यांनी शुक्रवारी पालिका सभागृहात मांडली. सभागृहाच्या मंजुरीनंतर महापौर प्रभू यांनी ही सूचना आयुक्त कुंटे यांच्याकडे पाठविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 2:37 am

Web Title: municipal corporation will fix policy for nameing
Next Stories
1 आदित्य दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ‘जैस थे’च
2 पशुधन विकास अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत
3 अवयव प्रत्यारोपणाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्र : सरकारकडून १० दिवसांत स्पष्टीकरण
Just Now!
X