News Flash

कल्याणमध्ये पालिका अभियंत्याला मारहाण

कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे आंबिवली रेल्वे फाटक ते वडवली गावापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. आपल्या घराच्या खासगी पोहोच रस्त्यापर्यंत पालिका अभियंता डांबर टाकत नाही याचा राग

| January 17, 2013 05:07 am

कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे आंबिवली रेल्वे फाटक ते वडवली गावापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. आपल्या घराच्या खासगी पोहोच रस्त्यापर्यंत पालिका अभियंता डांबर टाकत नाही याचा राग येऊन येथील पिता-पुत्राने शिवीगाळ करीत पालिका अभियंत्याला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.
महात्मा फुले ठाण्यातील पोलिसांनी सांगितले, वडवली रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना गणपती मंदिराजवळील गणेश व महादू तरे यांनी पालिका अभियंता दायमी मोबीम यांना आपल्या घराच्या पोहोच रस्त्यापर्यंत डांबर टाकण्यास सांगितले. हे खासगी काम असल्याने पालिकेची परवानगी घेऊन हे काम करावे लागेल असे मोबीम यांनी तरे यांना सांगितले. याचा राग येऊन या पिता-पुत्रांनी मोबीम यांना बेदम मारहाण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 5:07 am

Web Title: municipal engnieer hited in kalyan
Next Stories
1 हार्बरच्या प्रवाशांना दिलासा
2 डोंबिवलीत महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न
3 बारावीच्या वेळापत्रकाबाबत आज निर्णय होणार?
Just Now!
X