ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आईचे निधन झाले. निर्मला पाटेकर असे त्यांचे नाव होते. मुंबईतील रहात्या घरी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  नाना पाटेकर यांच्या आईला स्मृतीभ्रंश झाला होता. त्या जवळच्या माणसांनाही ओळखत नव्हत्या. नाना पाटेकर यांच्या आईच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांनी नाना पाटेकर यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. ओशिवरा येथील स्मशानभूमीत नाना पाटेकरांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यावेळी हजर होते.