30 September 2020

News Flash

नरेंद्र मोदी ‘अॅक्सिडेंट’ करणारे प्राइम मिनिस्टर – सचिन सावंत

'मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत देशाने आर्थिक प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठले'

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला काँग्रेसने विरोध केला असून रिलीज करण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चित्रपटावरुन मोदींवर टीका करताना नरेंद्र मोदी ‘अॅक्सिडेंट’ करणारे प्राइम मिनिस्टर असल्याचा टोला लगावला आहे.

‘मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत देशाने आर्थिक प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे अॅक्सिडेंट केले आहे. त्यामुळे मोदींवर आधारित अॅक्सिडेंट करणारे प्राइम मिनिस्टर असा चित्रपट बनवावा’, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

गेल्या चार वर्षांत देशातील राजकीय संवाद अतिशय खालील पातळीवर गेला आहे. दुसऱ्याचे कर्तृत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. चारित्र्यहनन करण्याचेही प्रयत्न सुरु असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 4:07 pm

Web Title: narendra modi is prime minister of accident
Next Stories
1 बंद असलेलं नाट्यगृह पुन्हा सुरु करण्यासाठी मनसेचं अनोखं आंदोलन
2 त्या रात्री अथर्वबरोबर काय घडलं! आठ महिन्यानंतरही रहस्य कायम
3 सांताक्रूझमधून १ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक
Just Now!
X