27 September 2020

News Flash

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट

एक दिवसाच्या मुंबई दौऱयावर आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली.

| June 27, 2013 04:21 am

एक दिवसाच्या मुंबई दौऱयावर आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईत पक्षाच्या राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मोदी थेट वांद्र्याल उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. 
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती. उत्तरखंडमध्ये अडकलेल्या १५ हजार गुजराती नागरिकांची मोदी यांनी आपल्या भेटीवेळी सुटका केल्याचे वृत्त एका इंग्रजी राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. यावरूनच मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. मोदी यांनी राष्ट्रीय नेतृत्त्व करताना संपूर्ण देशाचा विचार करायला हवा, असा सूर ‘सामना’तील अग्रलेखामध्ये व्यक्त करण्यात आला होता. हा अग्रलेख प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आम्ही मोदीवर नव्हे; त्यांच्या प्रचारकांवर टीका केली, अशी सारवासारव केली. मोदी यांचे काम चांगले असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी यावेळी दिले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरे स्वतः मोदी यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या गाडीपर्यंत आले होते.
मोदी यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील यावेळी उपस्थित होते. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 4:21 am

Web Title: narendra modi meets uddhav thackeray at matoshree
Next Stories
1 अनुदानित संस्थाचालकांची दुकानदारी बंद
2 पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून बलात्काराचा प्रयत्न
3 भाजीबाजारात वाटमारी!
Just Now!
X