लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Passenger Killed, Passenger Killed in Collision Local Train , Local Train in Mumbai, matunga road Railway station, western railway Services Disrupted, western railway, western railway news, dadar, marathi news, local train, Mumbai, Mumbai news, marathi news,
लोकलच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा विस्कळीत
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Cannot order implementation of Governments promises in Assembly High Court clarifies
विधानसभेतील सरकारच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचे आदेश देऊ शकत नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”

मध्य रेल्वे मुख्य मार्गिका

कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी येथे जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे त्या १५ मिनिटे विलंबाने धावतील.

आणखी वाचा-ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास: रहिवाशांच्या अनुपस्थितीमुळे सोडत रद्द

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द अकरण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल – वाशी यादरम्यान विशेष लोकल धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ठाणे – वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.

आणखी वाचा-मुंबई : सर्व्हर डाऊन झाल्याने सीईटी परीक्षेत गोंधळ

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक काळात सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. या लोकलला विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकात थांबा नसेल. तसेच ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.