लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२४ (पीसीएम ग्रुप) या परीक्षेच्या वेळी बोरिवली येथील आर. आर. इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर अचानक सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या मुलांचा गोंधळ उडाला. मात्र सीईटी सेलने तातडीने कार्यवाही करत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध केला. या समस्येमुळे दुपारच्या सत्रातील या केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

check the extent of paper crush in NEET UG exam Supreme Court ordered to release city wise and exam wise results
पेपरफुटीचा शहरनिहाय शोध; ‘नीट-यूजी’चा केंद्रनिहाय निकाल जाहीर करा!
mpsc keyboard
‘एमपीएससी’चे दुर्लक्ष; टंकलेखन परीक्षार्थींचे भविष्य अंधारात, ‘किबोर्ड’च्या…
mumbai University, Idol exams,
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आज होणाऱ्या परीक्षा १३ जुलैला होणार
High Court
इंटरनेट गेमिंगच्या व्यसनामुळे परीक्षा बुडली; बारावीची फेरपरीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, गुणवृद्धी परीक्षेला बसण्यास परवानगी
CET will provide well equipped verification center for admission process
सीईटी प्रवेश प्रक्रियेसाठी सुसज्ज पडताळणी केंद्र उपलब्ध करणार
scholarship exam result announced marathi news
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर…यंदा किती विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती?
State Level II CET for BMS BMS BBA BCA Admission
प्रवेशाची पायरी: बीएमएस/ बीएमएस/ बीबीए/ बीसीए प्रवेशासाठी राज्यस्तरीय द्वितीय सीईटी
huge response to additional cet of bba bca bms bbm
बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीला प्रतिसाद, दोन दिवसात २० हजारांहून अधिक अर्ज

बोरिवली येथील आर. आर. इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर सकाळी ९ ते १२ या सत्रातील (पीसीएम ग्रुप) परीक्षा सकाळी सुरू झाली. मात्र परीक्षेदरम्यान वारंवार सर्व्हर डाऊन होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी येऊ लागल्या. परिणामी काही विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. विद्यार्थ्यांनी आक्रमक होत केंद्र प्रमुखांना धारेवर धरले. मात्र सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत सर्व्हर सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाले नाही. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या परीक्षा घेण्यात येत होत्या.

आणखी वाचा-राज्यातील उष्माघाताच्या रुग्णसंख्या २०० पार

सकाळच्या सत्रात आलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे दुपारी २ ते ५ या वेळेत आर. आर. इन्फोटेक केंद्रावर घेण्यात येणारी एमएचटी सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला. सर्व्हरमधील तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असली तरी त्याची तपासणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा केंद्र, परीक्षेचा तारीख, परीक्षेची वेळ असे परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.