केरळमध्ये सत्तेत आलेल्या डाव्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा एक घटक पक्ष असून, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आल्याने सत्तेत सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विरोधात असला तरी केरळमध्ये हा पक्ष सत्तेत आला आहे. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा डाव्या आघाडीचा घटक पक्ष असून, आघाडीत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला चार जागा आल्या होत्या. यापैकी दोन उमेदवार निवडून आले आहेत. कट्टनाड मतदारसंघातून थॉमस चंडी, तर इथलूर मतदारसंघातून शशिंद्रन हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. डावी आघाडी सत्तेत आल्याने राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, असा पक्षाचा प्रयत्न राहील. निधर्मवादी पक्षांच्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून, सुरुवातीपासून आमचा पक्ष डाव्या आघाडीत असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. पक्षाचे दोन उमेदवार निवडून आल्याबद्दल पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला.

ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम