News Flash

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब : शरद पवार

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.

(फोटो: प्रशांत नाडकर)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती. दुपारी पावणे दोनच्या सुमारास खुद्द शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केल्याची माहिती दिली.

तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवण्यात आला होता. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली. तसंच यानंतर आपण पुण्यात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.

‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नका : पवार
“पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार, मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये,” असे आवाहन शरद पवार यांनी गुरुवारी ट्विटद्वारे केले होते. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असेही पवारांनी म्हटले होते.

Live Blog
13:51 (IST)27 Sep 2019
राष्ट्रवादीची भूमिका बदलली नाही - रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलली नाही. सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये ही त्यांची इच्छा आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शरद पवार यांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी कोणत्याही सहानुभूतीचं राजकारण करण्यात आलं नाही.

13:48 (IST)27 Sep 2019
शरद पवारांकडून शिवसेनेचे आभार

पाठिंबा दिल्याबद्दल शरद पवार यांनी शिवसनेचे आभार मानले आहेत. तसंच आता पुण्यात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

13:44 (IST)27 Sep 2019
ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब : शरद पवार

आज मी ईडीच्या कार्यालयाती जाऊन काही विनंती करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यांनी जो गुन्हा दाखल केला ज्या बँकेचा मी कधी संचालक नव्हतो. या प्रकरणी मी सहकार्य करण्यास तयार आहे. जो काही निर्णय घेतला तो राजकीय दृष्टीकोनातून घेतलेला आहे, असं आम्हाला वाटतं. ईडीने आम्हाला कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचं तसंच गरज असल्यास बोलावू असं सांगण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी भेट घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

13:28 (IST)27 Sep 2019
ईडीच्या कार्यालयात न जाण्याची पोलीस आयुक्तांची विनंती - आव्हाड

मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत आहे. तुम्ही जाणं टाळावं अशी विनंती पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. सध्या यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच पुढील माहिती देण्यात येईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

13:03 (IST)27 Sep 2019
पोलीस आयुक्त संजय बर्वे पवारांच्या निवासस्थानी दाखल

ईडीच्या ईमेलनंतरही शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयाला भेट देण्याचा पवित्रा घएतसा आगे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुन्हा एकदा त्यांची भेट घेण्यास त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. सकाळपासून दुसऱ्यांदा पोलीस त्यांच्या घरी त्यांची समजूत घालण्यासाठी पोहोचले आहेत.

12:49 (IST)27 Sep 2019
कोणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला? - नवाब मलिक

कोणाच्या सांगण्यावरून शरद पवारांवर गुन्हा दाखल केला? ईडी कोणाच्या सांगण्यावरून पत्र पाठवत आहे? हे समजणं गरजेचं आहे. ईडीने पाठवलेल्या ईमेलमध्ये तूर्तास चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं असलं तरी आवश्यकता भासल्यास चौकशीला यावं लागेल असं सांगण्यात आलं आहे. आम्हाला ईडीने आज बोलावलं नसलं तरी आम्ही ईडीकडून आमच्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी जाणार आहोत, असं नबाव मलिक म्हणाले.

12:42 (IST)27 Sep 2019
तूर्तास चौकशीची गरज नाही - ईडी

ईडीकडून शरद पवार यांना एक ईमेल पाठवण्यात आला आहे. सध्या कोणत्याही चौकशीची गरज नसल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच भविष्यातही चौकशीची गरज नसल्याचं ईडीनं म्हटल्याचं समोर आलं आहे. काल शरद पवार यांच्या वकीलाने केलेल्या ईमेलवर ईडीने रिप्लाय दिला आहे. तरीही पवार या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी ते अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि ईडीच्या वतीने त्यांच्या ईमेलला दिलेला रिप्लाय हाती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

12:29 (IST)27 Sep 2019
रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी; बस मार्गांमध्येही बदल

रस्त्यांवर अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक मार्गांवर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. तर बेस्ट बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. बॅलार्ड पिअरकडे जाणारे बसमार्ग पोलिसांनी अवतारसिंग बेदी चौक येथे बंद केल्याने 3 आणि 108 या क्रमांकाच्या बसेस मिंट मार्गाने आरबीआयकडे सरळ जाणार आहेत. तर 66 क्रमांकाच्या बसचा मार्ग भाटिया बाग येथे खंडित करण्यात आला आहे. तसंच 122 क्रमांकाच्या बसचा मार्ग स्वामी दयानंद सरस्वती मार्ग येथे खंडित करण्यात आला आहे.

11:48 (IST)27 Sep 2019
पवारांना लक्ष्य केलं जात आहे : राहुल गांधी

शरद पवार हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांना सरकारकडून लक्ष्य करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेला महिनाभराचाच कालवधी असताना अशी कारवाई सुरू आहे, असं म्हणतं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

11:37 (IST)27 Sep 2019
धरपकड होणार हे गृहित धरूनच कार्यकर्ते येत आहेत : छगन भुजबळ

शरद पवारांवर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. सहाजिकच त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते येणार. आपली धरपकड होणार हे गृहित धरूनच ते येत आहेत. जर त्यांना ईडीने बोलावलं नाही तर माध्यमांमध्ये ही बातमी आली कुठून. ही नावं बाहेर कशी आली? सर्वच माध्यमे तर खोटं छापणार नाहीत. कार्यकर्ते आपलं करतील प्रशासन त्यांचं काम करतील, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

11:34 (IST)27 Sep 2019
राष्ट्रवादी कार्यालाबाहेर शेकडो कार्यकर्ते उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते हजर झाले आहेत. कार्यकर्त्यांचा कार्यालयाबाहेर ठिय्या. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधा घोषणाबाजीही केली.

11:21 (IST)27 Sep 2019
हिंगोली- नांदेड रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे रस्ता रोको

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर ईडीने सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तसंच याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हिंगोली- नांदेड रस्त्यावरील खटकाळी बाय पास रोडवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

https://platform.twitter.com/widgets.js

10:59 (IST)27 Sep 2019
महाराष्ट्रात यापूर्वी कधीही सूडाचं राजकारण झालं नाही: संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी सूडाचं राजकारण कधीही झालं नाही. शरद पवार यांना ईडीकडून मिळत असलेली वागणूक योग्य नाही. ते राजकाणातील भीष्म पितामह आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

10:56 (IST)27 Sep 2019
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आणि ईडीची - मुंडे

राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येत आहेत. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची आणि ईडीची असेल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली. देशात लोकशाहीच राहिली नागी असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

10:48 (IST)27 Sep 2019
ईडी कार्यालयाबाहेर ड्रोनवरून नजर

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोनच्या माध्यमातूनहीन नजर ठेवण्यात येत आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

10:08 (IST)27 Sep 2019
कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बंदचं आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापूरमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या बंदला या ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकातून शिवाजी चौकात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच मोर्चानंतर तहसीलदार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना जमण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

10:00 (IST)27 Sep 2019
धनंजय मुंडे ईडीच्या कार्यालयात जाणार

शरद पवार हे दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत रोहित पवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. याचसोबत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हेदेखील कार्यालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हुकुमशाहीच्या विरोधातील हा लढा तुमचा एकट्याचा नाही. आम्ही कायम तुमच्या सोबत राहू असं ट्विटही त्यांनी केलं आहे. 

https://platform.twitter.com/widgets.js

09:49 (IST)27 Sep 2019
आजपर्यंत कोणते दिग्गज अडकले ईडीच्या जाळ्यात?

अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडी ही संस्था मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकरणांसाठी चर्चेत आहे. मात्र अनेकांना ‘ईडी’ म्हणजे काय? या संस्थेची स्थापना कधी झाली? ही संस्था कशी काम करते? आतापर्यंत कोणत्या घोटाळ्यांची चौकशी ईडीने केली आहे? ईडीवर होणारे आरोप कोणते? ईडीचा रेकॉर्ड कसा आहे याबद्दल खूप कमी माहिती आहे.

व्हिडीओ पाहा 

09:37 (IST)27 Sep 2019
एकंदरीत परिस्थिती गंभीर - जितेंद्र आव्हाड

अनेक ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहे. सामान्य मुंबईकरांना याचा कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यास शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी आता भेटीसाठी येत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

09:34 (IST)27 Sep 2019
पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड : नवाब मलिक

शरद पवार हे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते मुंबईत हजर राहणार आहेत. मध्यरात्रीपासून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. ही दडपशाही योग्य नसून आम्ही त्याचा निषेध करतो, असं पक्षाचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

09:23 (IST)27 Sep 2019
ईडीच्या कार्यालाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा

दक्षिण मुंबईतील काही परिसरांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसंच मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

09:20 (IST)27 Sep 2019
खोटे आरोप करून पवारांची बदनामी - जयंत पाटील

पवारांना सर्वच ठिकाणाहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यावर विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी केला. महाराष्ट्रातील लोकांचा गैरसमज होऊ नये. पवार खुल्या दिलाने सर्व प्रश्नांची उत्तरं देतील. पवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता हे सूडाचं राजकारणं सुरू झालं आहे. कर नाही त्याला डर कशाला ही पवारांची भूमिका आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी. तसंच ते ईडीला सहकार्य करण्यासाठी निघाले आहे. कार्यकर्त्यांनी एकत्रित गर्दी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासोबत असणारे असंख्य कार्यकर्ते मुंबईत येण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांनी शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलंय.

09:15 (IST)27 Sep 2019
दक्षिण मुंबईतील काही परिसरात जमावबंदी लागू

शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात येणार असल्याने या ठिकाणी असंख्य कार्यर्तेही जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

09:12 (IST)27 Sep 2019
रोहित पवार, जितेंद्र आव्हाड पवारांच्या निवासस्थानी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत.

Next Stories
1 परवान्याचे वर्षभरात नूतनीकरण बंधनकारक
2 ‘आय.एन.एस. खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात लवकरच
3 म्हाडा अधिकाऱ्यांची स्वयंघोषित आचारसंहिता!
Just Now!
X