15 December 2017

News Flash

माहिममधील नया नगर झोपडपटटीला आग; सहा जणांचा मृत्यू

माहिममधील रहेजा रूग्णालयाजवळ असलेल्या नया नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला

मुंबई | Updated: January 25, 2013 11:32 AM

माहिममधील रहेजा रूग्णालयाजवळ असलेल्या नया नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये मध्ये तीन लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या आठ गाड्या आणि एक रूग्णवाहिका रवाना झाली आहे.    
आज (शुक्रवार) सकाळी पाच वाजता ही आग लागली. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना ताबडतोब भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या आगीमुळे ३००० लोक बेघर झाले आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

First Published on January 25, 2013 11:32 am

Web Title: nearly 3000 homeless after mumbai slum fire in mahim
टॅग Fire,Mahim,Naya Nagar