बेदरकारपणे वाहने चालवून अनेकांच्या जिवाशी खेळणाऱ्या वाहनचालकांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी यापुढे अपघात झाल्यास चालकाबरोबरच त्यांच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्यात निर्माण होणाऱ्या सर्व महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची तरतूद निविदांमध्येच करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाचे सुमारे तीनशे अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात येणार असून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर जाचक नाही पण तापदायक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गेल्या आठवडय़ात झालेल्या भीषण अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज परिवहनमंत्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय देशमुख यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
द्रुतगती मार्गावरील अपघातामुळे प्रवाशांमध्ये चिंता आहे. अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 12:20 am