News Flash

मंत्रिमंडळाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची सर्वाधिक दांडी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आघाडीवर

| August 2, 2015 04:42 am

मारूतीच्या मंदिरातही महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कोणत्याही महिलेने अपमान वाटून घेण्याचे कारण नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आघाडीवर असून ११ डिसेंबर २०१४ ते जून २०१५ या कालावधीत झालेल्या २८ बैठकांपैकी ९ बैठकांना त्या अनुपस्थित राहिल्या.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळातील उपस्थितीची माहिती मागितली होती. अवर सचिव नि.भा. खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ बैठकांपैकी पंकजा मुंडे ९, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ िशदे ७, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत ६, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ५, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले ५ बैठकांना अनुपस्थित होते. ही माहिती मुख्य सचिव कार्यालयाने दिल्याचे गलगली यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 4:42 am

Web Title: pankaja absent on meeting
टॅग : Meeting
Next Stories
1 चिक्की प्रकरणाची चौकशी लांबण्याची शक्यता
2 याकूबच्या पत्नीस खासदार करण्याची मागणी करणाऱ्या सप नेत्याची हकालपट्टी
3 ट्विटरचे संकेतस्थळ आता मराठीत
Just Now!
X