18 February 2020

News Flash

International Yoga Day : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सांगितलं योगासनांचं महत्त्व!

मुंबईकरांनी उत्साहात साजरा केला योग दिवस

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त देशभरातले १३ कोटी लोक देशाच्या कानाकोपऱ्यात योगासनं करत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योगासन शिबीरात हजेरी लावली. योगासनं करणं किती महत्त्वाचं असतं हे शिल्पा शेट्टीने उपस्थितांना सांगितलं. फक्त शिल्पा शेट्टीच नाही तर या शिबीरात हजर असलेल्या प्रत्येकानेच उत्साहात योगासनं करत आजचा योग दिवस साजरा केला.

योग आणि साधना हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असला पाहिजे. दिवसातून १० मिनिटांचा वेळ स्वतःसाठी काढा. प्राणायमही आवर्जून करा असेही शिल्पा शेट्टीने सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक दिवस आधीच शिल्पा शेट्टीने एक खास अॅप तयार केले आहे. आपल्या चाहत्यांना खास भेट देण्यासाठीच तिने हे अॅप तयार केल्याचे सांगितले. SS APP असे या अॅपचे नाव आहे असेही शिल्पा शेट्टीने सांगितले.

नांदेडमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली. आजचा दिवस भाषणाचा नसून योगासनांचा आहे, योग ही आपल्या देशातील प्राचीन परंपरा असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातच नाही तर जगभरात पोहचवली. आज सगळं जग भारताच्या या प्राचीन परंपरेचा आदर करत योग करतं आहे याचा अभिमान आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत योग पोहचवणं हे आमचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

 

First Published on June 21, 2019 8:35 am

Web Title: people perform yoga at the gateway of india in mumbai actor shilpa shetty also present scj 81
Next Stories
1 ‘बेस्ट’चे किमान भाडे ५ रुपये!
2 धारावीच्या जागेवर ‘बीकेसी’सारखे संकुल!
3 मुंबई महानगर प्रदेशात शहापूर, मुरबाडचा समावेश
Just Now!
X