25 October 2020

News Flash

प्लास्टिकबंदीमुळे स्टीलच्या किटल्यांना भाव

भांडय़ांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या या किटलींना सध्या चांगलीच मागणी आहे.

दुकानदारांकडून पिशव्या देणे बंद

राज्यभरात नुकत्याच झालेल्या प्लास्टिकबंदीमुळे धास्तावलेल्या दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर कमी केल्याने मुंबईकरांनी दुधासारख्या द्रव पदार्थाकरिता स्टीलच्या किटलीचा पर्याय आजमावण्यास सुरुवात केली आहे. भांडय़ांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या या किटलींना सध्या चांगलीच मागणी आहे.

गेल्या दोन-तीन दशकांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला. मात्र, त्याआधी दूध, तेल असे द्रवपदार्थ बाजारातून सुटे खरेदी करावे लागत असत. त्यासाठी घरातूनच बाटली, किटली वा एखादे भांडे घेऊन दुकानात जावे लागले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाल्यानंतर हा त्रास कमी झाला. मात्र, राज्य सरकारने प्लास्टिकबंदी जारी केल्यापासून ते जुने दिवस पुन्हा अवतरल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. मुंबईत अजूनही बहुतांश दुकानांत प्लास्टिक पिशव्यांतून सुटे दूध विकले जात असले तरी, अनेक ठिकाणी दूधविक्रेत्यांनी पिशव्या देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांना घरातूनच किटली आणावी लागते. याचा परिणाम किटलीच्या बाजारावर दिसून येत आहे. ‘पूर्वी महिन्याला एखाददुसरी किटली विकली जात असे. आता माझ्याकडे दिवसाला किमान एका किटलीची नक्कीच विक्री होते. मागणी वाढल्याने आम्ही दुकानाच्या दर्शनीभागी विविध आकाराच्या किटल्या लावल्या आहेत,’ असे गोरेगाव गृह वस्तू भंडारचे मालक जयंतीलाल जैन यांनी सांगितले. प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर दोन ते तीन दिवसांतच ग्राहक किटलीकरिता विचारणा करू लागले. बंदीनंतर तर किटली विक्री पहिल्यापेक्षा दुप्पट वाढली, असे मालाड वस्तू भंडारचे तुषार जैन यांनी सांगितले. एक लिटरची किटली बाजारात साधारण १८० रुपये तर दोन लिटरची किटली २४० रुपये दराने उपलब्ध आहे. प्लास्टिकबंदीनंतर कागदाचा वापर वाढला असला तरी सुटे तेल व दूध या करिता किटलीशिवाय पर्याय नाही. यामुळे कारखानदारांनीदेखील किटलीचे उत्पादन वाढविले आहे. त्यात विविध आकार व प्रकारच्या किटल्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एक ते अडीच लिटपर्यंतच्या किटल्यांची विचारणा ग्राहकांकडून होत असल्याची माहिती ‘भारत स्टील’चे चिमण कुबडिया यांनी दिली. महिन्याला किमान दोन ते तीन किटल्यां ची विक्री आधी होत असे. गेल्या काही दिवसांत किटली खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला असून दिवसाला किमान दोन तरी किटल्या विकल्या जात आहेत. त्यामुळे किटल्यांचा नवीन मालहीआणला असल्याचे महाराजा स्टील भंडारचे विकास जैन यांनी म्हटले. तर आठवडय़ाभरात ५० हून अधिक किटल्यांची विक्री केल्याचे पूजा स्टील सेंटरचे हंसराज कुमावत यांनी सांगितले.‘पूर्वी पिशव्यांमधून दूध पुरवीत होतो. ते सोपे होते. परंतु आता मोठी किटली घेऊन इमारतीत जावे लागते. दूध डेअरीवर येणाऱ्यांना किटली आणण्यास सांगत आहोत,’ असे  इमरान पटेल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 4:18 am

Web Title: plastic banned steel canisters
Next Stories
1 बहुमजली इमारतींविरोधातील याचिका निकाली
2 आम्ही मुंबईकर : चळवळींचे केंद्र
3 खाऊ खुशाल : ‘फॅन्सी’ पदार्थाचा प्रणेता
Just Now!
X