News Flash

पालिके तील अंतर्गत वादांमुळे वांद्रे तलावाची दुर्दशा

पाच वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून सुशोभित केलेल्या वांद्रे तलावाची सध्या दुर्दशा झाली आहे.

पालिके तील अंतर्गत वादांमुळे वांद्रे तलावाची दुर्दशा

देखभाल करण्याकडे दुर्लक्ष; तलावात कचऱ्याचे ढीग

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : पाच वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून सुशोभित केलेल्या वांद्रे तलावाची सध्या दुर्दशा झाली आहे. उद्यान विभाग आणि विभाग कार्यालय यांच्यातील वादामुळे या तलावाची दुर्दशा झाल्याचे पुढे आले आहे. या तलावाची देखभाल नक्की कोणी करायची यावरून अधिकारांच्या हद्दीच्या वादामुळे तलावात मात्र कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. गाळाने भरलेला  तलाव सामाजिक कार्यकर्त्यांनी साफ करायला सुरुवात के ल्यानंतर आता पालिके ला जाग आली आहे. या तलावाची स्वच्छता व देखभालीसाठी लवकरच कं त्राट दिले जाणार आहे.

वांद्रे पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावर मुख्य रस्त्याला लागून वांद्रे तलाव आहे. या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पालिके च्या उद्यान विभागाने २०१५ पासून हाती घेतले होते. तीन ते चार कोटी खर्चून दोन टप्प्यात हे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र सध्या या तलावाच्या स्वच्छतेसाठी व सुरक्षेसाठी कं त्राटदारच नसल्यामुळे तलाव गाळाने भरला आहे, तलावाच्या पाण्यावर कचरा तरंगू लागला आहे. शेवाळ जमल्यामुळे पाणी हिरवे झाले आहे, दिवे तुटले आहेत. त्यामुळे रात्री हा तलाव म्हणजे समाजकं टकांसाठी हक्काचे स्थान बनले आहे. वांद्रे परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वांद्रे तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या या मोहिमेमुळे पालिके च्या दोन विभागांमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे. नुकत्याच झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. ‘तलावांच्या देखभालीसाठी धोरण आणा’

मुंबईत वांद्रे तलावाप्रमाणे अनेक तलाव आहेत. हे तलाव जतन करण्यासाठी पालिके ने एक सर्वसमावेशक धोरण आणण्याची गरज आहे. जैवविविधता समिती स्थापन करण्यात आली. पण या समितीने पुढे काय के ले, असाही सवाल आसिफ झकारिया यांनी के ला आहे.

या तलावाच्या देखभालीसाठी व स्वछता आणि सुरक्षेसाठी नक्की किती खर्च येईल याचा कार्यालयीन अंदाज काढून लवकरच त्यासाठी निविदा मागवू आणि कं त्राटदाराची नेमणूक करू.

– विनायक विसपुते, साहाय्यक आयुक्त, एच पश्चिम विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 1:33 am

Web Title: plight of bandra lake internal disputes municipality ssh 93
Next Stories
1 पुस्तकांच्या पीडीएफ, नक्कल प्रतींविरोधात कठोर पाऊल
2 अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी
3 करोनाकाळात राजकीय आंदोलने रोखा; अन्यथा आम्ही आदेश देऊ!
Just Now!
X