News Flash

महिला पोलिसांशी असभ्य संभाषण करणाऱ्यांना अटक

मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी अश्लिल संभाषण करणाऱ्या दोघांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. शंभो पासवान (१९) व सागर

| July 2, 2013 02:51 am

मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी अश्लिल संभाषण करणाऱ्या दोघांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. शंभो पासवान (१९) व सागर सुत्रे (२९) अशी त्यांची नावे आहेत. नियंत्रण कक्षातील महिला कर्मचाऱ्यांना गेल्या मार्च महिन्यापासून रात्री उशीरा नियंत्रण कक्षातील हेल्पलाईन क्रमांकावर दूरध्वनी येत होते. दूरध्वनी करणारे फोनवर अश्लिल संभाषण करत असत. आझाद मैदान पोलिसांनी तपास करून अखेर या दोघा जणांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:51 am

Web Title: police arrested two men for rough conversation to lady constable
Next Stories
1 पश्चिम रेल्वे विस्कळीत
2 मार्वे समुद्रात बुडालेल्या तीन विद्यार्थाचे मृतदेह मिळाले
3 तळोजा तुरुंगात केकच्या डब्यातून पिस्तूल?
Just Now!
X