वाढत्या सायबर गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेत मुंबई पोलिसांनी स्वतंत्र सायबर संकेतस्थळ सुरू केले आहे. बुधवारी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. मुंबई लवकरच चार नवीन सायबर पोलीस ठाणी तयार होणार आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी या संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे. लोकांना ऑनलाईन तक्रारी करण्याची सोय या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळालाही त्याची लिंक जोडण्यात येणार आहे.