18 January 2018

News Flash

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : रेखाचित्राच्या आधारे आरोपीचा तपास सुरू

आरे वसाहतनजीक असलेल्या वस्तीत आईवडिलांसह राहणारी १५ वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी घरी एकटीच होती.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: April 29, 2016 1:15 AM

गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतजवळील वस्तीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर घरात घुसून अत्याचार करणाऱ्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी या तरुणाने घरात घुसून मुलीवर अत्याचार केला होता. पोलिसांनी या तरुणाचे रेखाचित्र तयार केले असून त्याआधारे त्याचा शोध घेण्यात येत आहे.
आरे वसाहतनजीक असलेल्या वस्तीत आईवडिलांसह राहणारी १५ वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी घरी एकटीच होती. त्या वेळी विशीतील एक तरुण घरी आला. मी तुझ्या आईला ओळखतो. तिलाच भेटायला आलो, असे हा तरुण या मुलीला सांगू लागला. तहान लागल्याचे सांगत या तरुणाने मुलीकडे पाणी मागितले. मुलगी स्वयंपाकघरात गेली असता, तरुण घरात शिरला. त्याने हळूच दार लावून मुलीवर बलात्कार केला. व तेथून पळ काढला. प्रकार समजताच आईवडिलांनी आरे पोलिसांकडे याची तक्रार केली. दिलेल्या तक्रारीनुसार तरुणाचे रेखाचित्र तयार करण्यात आल्याचे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी स्पष्ट केले. तरुणाचा शोध घेण्यासाठी दोन पथके स्थापन केल्याचेही ते म्हणाले.

First Published on April 29, 2016 12:10 am

Web Title: police release sketch of man suspected of raping 15 year minor girl
  1. No Comments.