विविध सामाजिक चळवळींत सहभागी होऊन ठोस न्यायवादी भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकत्र्या, रंगभूमीच्या भाष्यकार, लेखिका, अशा विविध पैलूंचा सारख्याच ताकदीने अंगीकार के लेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. पुष्पा भावे. त्या हयात असताना ज्यांनी त्यांच्या कणखर भूमिकांचा आणि प्रभावी वक्तृत्वाचा अनुभव घेतला अशा व्यक्तींच्या लेखनातून ‘पुष्पा भावे – विचार आणि वारसा’ हा स्मृतिग्रंथ आकाराला आला असून त्याचे प्रकाशन रविवारी डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारका’च्या ‘आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रा’तर्फे  ‘मायमावशी’ हे भाषांतरविषयक नियतकालिक चालवले जाते. या नियतकालिकाचा एक विशेषांक प्रा. पुष्पा भावे यांना समर्पित करण्याचे ठरले होते. त्यासाठी भावे यांचे समकालीन लेखक, समीक्षक, विद्यार्थी यांनी शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या आठवणी मागवण्यात आल्या होत्या. त्याला भावे यांच्या चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता हे लेखन विशेषांकापुरते मर्यादित न ठेवता त्याचा स्वतंत्र स्मृतिग्रंथ प्रकाशित के ला जाणार आहे. भावे यांच्या विविध ठिकाणी प्रकाशित झालेल्या लेखनाचाही यात समावेश आहे. आंतरभारतीचे कार्याध्यक्ष गणेश विसपुते यांनी या ग्रंथाचे संपादन के ले असून वैशाली रोडे सहसंपादक आहेत.

व्यक्तिमत्त्वाची खोली, विचारांची व्याप्ती अधोरेखित

वैचारिक स्पष्टता, आपल्या मतांचा निर्भीड उच्चार आणि लोकशाही मूल्यांवर अढळ निष्ठा असलेले भावे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व सत्तरच्या दशकापासून महाराष्ट्राला लाभले. कष्टकऱ्यांचा संघर्ष आणि स्त्रीवादी चळवळीत सहभागी होतानाच राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या हुकू मशाहीलाही त्यांनी विरोध के ला. भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाची खोली आणि विचारांची व्याप्ती त्यांच्या स्मृतिग्रंथातून अधोरेखित करण्यात आली आहे. प्रकाशनाच्या कार्यक्रमात रामदास भटकळ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.