News Flash

Pulwama Terror Attack: ‘बांधले कफन डोक्याला मी…’

भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकाच्या मनातील अंतरंग वाचकाने कवितेच्या माध्यमातून मांडले आहेत.

रोविला आहे हृदयात माझ्या, मुक्त फडकता झेंडा , तिरंगा मी ...

‘कफन’

बोलकं छायाचित्र तिचं,
खिशात हृदयाच्या ठेवलय मी,
हास्य मधुर तिचं …
डोळ्यात माझ्या साठवलंय मी

घायाळ करणारे इशारे तिचे,
आलोय तिथेच विसरून मी …
नाद मंजुळ पैंजणांचा तिच्या,
आलोय तिथेच हरवून मी

बोबड्या बोलाना
बाळाच्या माझ्या आलोय फसवून मी,
पत्नीच्या विरह अश्रुंना
निरोप प्रेमाचा आलोय देऊन मी

चेहऱ्यावरच्या मात्या पित्याच्या
प्रश्नांना आलोय भुलवून मी
आशीर्वादाचे पंख
गरुडझेपि आलोय लावून मी

आलोय जाळून तिथेच,
जाती धर्मांचे गाठोडे मी
आलोय तोडून शृंखला,
भाषा प्रांतवादांच्या मी

भारतमातेचा जयघोष करीत,
आहे सज्ज रक्षणासाठी तिच्या मी
रोविला आहे हृदयात माझ्या,
मुक्त फडकता झेंडा , तिरंगा मी …

ओकीत आग थकेल सूर्य,
करपलो तरी नमविन शत्रूला मी
गारठतील पर्वतरांगा हिमवर्षावाने,
गारठलो तरी उठेन पेटून मी

प्रेमापायी मायभूमीच्या,
बांधले कफन डोक्याला मी
वीर मरणाचे स्वप्न पहात,
उभा धगधगत्या सीमेवर मी

देता आलिंगन वीरमरणाला
कानी हुंदके मायभूचे हे पडती …
सोंगा ढोंगाची नको मज श्रद्धांजली,
देशप्रेम ज्योतीने पेटवारे आत्मज्योती …
– मधुकर गजाकोष  (मधुकोश)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:53 pm

Web Title: pulwama terror attack poem expressing soldiers feelings
Next Stories
1 गुजरात हाय अलर्टवर! आत्मघातकी हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणांचा इशारा
2 काश्मीरमध्ये सार्वमत का घेतले जात नाही; सरकारला कशाची भीती वाटते : कमल हसन
3 शहीद जवानाच्या पार्थिवासमोर केंद्रीय मंत्र्याचा सेल्फी ?
Just Now!
X