News Flash

लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबत राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सर्वसामान्य प्रवाशांसाठी मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबई : लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रसंगी सर्वसामान्य प्रवाशांसाठी मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

करोनाचा कहर लगेचच ओसरणार नाही, या तज्ज्ञांच्या मतांकडे लक्ष वेधत राज यांनी धोरण आखताना सरकारने कल्पकता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त के ली आहे. ‘या आजाराचे अस्तित्व स्वीकारून त्याच्याशी मुकाबला करावा लागणार आहे. म्हणून टाळेबंदी, निर्बंध या सरधोपट मार्गांच्या पलिकडे जाऊन उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी त्यांनी के ली आहे.

… तर आंदोलन

सरकारने सकारात्मक उपाय योजले नाहीत तर त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. त्या वेळी मनसेही सर्वसामान्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा राज यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:04 am

Web Title: raj thackeray letter to the chief minister regarding restrictions on local travel akp 94
Next Stories
1 राज कुंद्राच्या आदेशावरून बनविलेले ७० अश्लील व्हिडिओ मुंबई पोलिसांनी केले जप्त
2 राज कुंद्रांनी मुंबई पोलिसांना दिली २५ लाखांची लाच; कारण आलं समोर… ACB ला आलेल्या Email मुळे खळबळ
3 मुंबईत दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी; पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ भाजपाकडून सभा तहकुबीचा प्रस्ताव
Just Now!
X