03 April 2020

News Flash

धक्कादायक! मुंबईत १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर खिडकीतून फेकले

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अन्वर शेख (२१) या आरोपीला अटक केली आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अन्वर शेख (२१) या आरोपीला अटक केली आहे. १७ जूनला ही घटना घडली. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसआरए इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने त्यांना फोन करुन एक मुलगी जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती दिली. दुसऱ्या मजल्यावरील घरातून अन्वरने पीडित तरुणीला ढकलून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला व पीडित मुलीला कूपर रुग्णालयात दाखल केले. तिचा हात फॅक्चर झाला आहे.

मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी पीडित तरुणीची जबानी नोंदवून घेतल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. पीडित तरुणी तिच्या काका-काकींसोबत त्याच इमारतीत राहते. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पीडित तरुणी दुकानात वस्तू आणण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी अन्वर शेखने जबरदस्तीने खेचून त्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेले व तिच्यावर बलात्कार केला.

संध्याकाळी सातच्या सुमारास मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या काकांनी शोधाशोध सुरु केली. त्यावेळी एका शेजाऱ्याने अन्वर शेख मुलीला जबरदस्तीने खोलीत घेऊन गेल्याचे सांगितले. ज्यावेळी मुलीच्या काकांनी शेखच्या घराचा दरवाजा ठोठावला त्यावेळी तो घाबरुन गेला. आपला गुन्हा उघड होऊ नये यासाठी त्याने मुलीला दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली ढकलून दिले व पाईपवरुन खाली उतरुन पसार झाला.

पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी पथक बनवले व त्याला अटक केली. कलम ३७६,३७७,३०७,३४२,३५४बी आणि ३६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 4:10 pm

Web Title: rape on minor girl midc police registered case
Next Stories
1 पोलिसांनी पती-पत्नीला भांडण मिटवण्यासाठी बोलावलं पण झाले चाकू-तलवारीचे वार
2 धक्कादायक! कल्याण स्टेशनवर पोलिसाचे महिलेबरोबर अश्लील चाळे, लोकांनी चोपले
3 आमचा पेशवाईला विरोध त्यामुळे पगडीलाही विरोधच – प्रकाश आंबेडकर
Just Now!
X