News Flash

मृतदेहावरील लाल मातीने हत्येचे गूढ उकलले

अनोळखी मृतदेहाच्या पायाला लागलेल्या लाल मातीने एका हत्येचे गूढ उकलण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

| December 10, 2014 12:02 pm

अनोळखी मृतदेहाच्या पायाला लागलेल्या लाल मातीने एका हत्येचे गूढ उकलण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.  अवघ्या २४ तासांत रेल्वे पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना गजाआड केले . प्रेमसंबंधांतून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली होती.
सोमवारी सकाळी खारघर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकामधील रुळावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर असंख्य जखमा असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेहाच्या पायावर लाल माती लागली होती. अशी लाल माती वीटभट्टीत आढळते. केवळ त्याच लाल मातीच्या आधारे पोलीस पथकाने परिसरातील वीटभट्टीत शोध घेतला. हा मृतदेह खारघर येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या संजय पाटील (३५) याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या पत्नीला चौकशीत त्यानंतर तिला चौकशी करून ताब्यात घेतल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2014 12:02 pm

Web Title: red soil on dead body open murder mystery
टॅग : Dead Body
Next Stories
1 मुख्याध्यापकासह लाचखोर त्रिकुटास ठाण्यात अटक
2 मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू
3 ‘उबेर’च्या महाव्यवस्थापकांवर मुंबईत हल्ला
Just Now!
X