01 March 2021

News Flash

ऊर्जावंतांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाची नोंदणी १३ फेब्रुवारीपर्यंत

(संग्रहित छायाचित्र)

तरुणाईच्या सर्जनशीलतेला आणि जिद्दीला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची नोंदणी सुरू झाली आणि राज्यभरातून दमदार प्रतिसाद मिळाला. कला, क्रीडा, संशोधन अशा अनेकविध क्षेत्रांतून तरुणांनी आपला सहभाग या उपक्रमासाठी नोंदवला आहे. नोंदणी आणि शिफारसीसाठी मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता अधिकाधिक तरुणांना या उपक्रमात सहभागी होता यावे म्हणूनच या उपक्रमासाठीच्या नोंदणीच्या तारखेत मुदतवाढ झाली असून आता १३ फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.

जिद्दीच्या जोरावर कर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या तरुणाईमुळे ती क्षेत्रे समृद्ध होतात. त्याचबरोबर त्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकणाऱ्यांपुढेही आदर्श निर्माण होतात. असे आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाईचा शोध सुरू झाला असून गेल्या आठवडय़ापासून नोंदणीसाठी प्रवेशपत्रिका ऑनलाइन भरल्या जात आहेत.

विविध क्षेत्रांत नवे मानदंड निर्माण करणाऱ्या तरुणांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून करण्यात येते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत २६ तरुण ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. अनाथ, अपंगांसाठी धडपडणारे, कायद्याच्या माध्यमातून जनआंदोलनाचा आधार ठरणारे, तिरस्कृतांचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांची सखी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात ठोस काम करून सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला गौरविण्यात आले.

अर्ज कसा भराल?

या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे https://taruntejankit.loksatta.com/ येथे पाहायला मिळतील. या ठिकाणी असलेली प्रवेशपत्रिका १३ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन भरून पाठवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येणार आहेत.

प्रायोजक :  हा सोहळा ‘केसरी टूर्स’ पुरस्कृत आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत. उपक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर ‘एबीपी माझा’ आहे. तर नॉलेज पार्टनर ‘पीडब्ल्यूसी’ आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:13 am

Web Title: registration of loksatta tarun tejankit program till february 13 abn 97
Next Stories
1 करोनामुळे उद्योगांची चलबिचल
2 बाजारपेठांच्या पोटात गोळा
3 पदनाम वेतनवाढ प्रकरणाची प्रधान महालेखापालातर्फे चौकशी
Just Now!
X