News Flash

निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे काँग्रेसमध्ये

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रवेश

संग्रहित छायाचित्र

निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी खासदार कुमार केतकरही उपस्थित होते. अभय ठिपसे यांनी सलमान खानची हिट अँड रन केस, बेस्ट बेकरी केस, साध्वी प्रज्ञा केस यांसारखी अनेक प्रकरणे न्यायमूर्ती असताना हाताळली आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक खटल्यात अनियमितता दिसत अशून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आरोपींवर फेरविचार करायला हवा असे म्हटले होते. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले होते. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भिवंडी येथील कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी गोरेगावमध्ये सभाही घेतली. त्यानंतर मुंबईत आल्यावर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 6:56 pm

Web Title: retired bombay high court justice abhay thipsay joins congress from today
Next Stories
1 शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराची मुंबई-ठाण्यातून तडीपारी
2 … आणि भाजी विक्रेता करोडपती होता होता राहिला!
3 विरोधात लढलो तरी अडवाणी, वाजपेयींचा काँग्रेसकडून आदर: राहुल गांधी
Just Now!
X