09 March 2021

News Flash

नववर्षांच्या ‘पार्टी’साठी केली ६ लाखांची चोरी

नव्या वर्षांचे स्वागत दणक्यात करण्यासाठी वेगवेगळे बेत आखले जात असताना कांदिवलीतील दोन तरुणांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या पार्टीचा बेत तडीस नेण्यासाठी चक्क ६ लाखांची चोरी केल्याचे

| December 25, 2012 04:33 am

नव्या वर्षांचे स्वागत दणक्यात करण्यासाठी वेगवेगळे बेत आखले जात असताना कांदिवलीतील दोन तरुणांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या पार्टीचा बेत तडीस नेण्यासाठी चक्क ६ लाखांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. जगदीश सुतार (२५) आणि एकनाथ गायकवाड (२६) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.
कांदिवली येथील ठाकूर संकुलातील गोकुल मोनार्च या इमारतीत करीवाला दाम्पत्य राहते. हे दांपत्य नेहमी संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर जात असत. १८ डिसेंबरला ते फेरफटका मारून घरी परतले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे आढळून आले. दरवाजा न तोडता अज्ञात चोरांनी घरात घुसून सहा लाखांचा ऐवज चोरल्याचे स्पष्ट झाले होते. करीवाला यांच्या शेजारी राहणारा  जगदीश सुतार हा नेहमी घरात यायचा. चोरीच्या दोन दिवस आधीही तो घरी येऊन सुमारे वीस मिनिटे गप्पा मारून निघून गेला होता, अशी माहिती कृष्णा यांनी दिली. पोलिसांनी तो धागा पकडून पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यावर जगदीशने चोरीची कबुली दिली.
कृष्णा यांच्या नकळत बनावट चावी बनवली आणि एकनाथ गायकवाड या मित्राच्या मदतीने ही चोरी केली. नववर्षांचे जंगी स्वागत करण्यासाठी आम्ही पार्टी करणार होतो. त्यासाठी पैसे हवे होते, म्हणून ही चोरी केल्याचे मान्य केल्याची माहिती समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण शिंदे यांनी दिली.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:33 am

Web Title: robbery of 6 lakhs for makeing party of new year
टॅग : Robbery
Next Stories
1 पेडर रोड उड्डाणपूल; निविदाप्रक्रिया सुरू
2 चेतना महाविद्यालयातील चाकूहल्ला प्रकरण
3 अपघात टाळण्यासाठी रात्रीची गस्त वाढवणार- विजय कांबळे
Just Now!
X